रुग्णाने पुसली फरशी; नागपूरच्या मेडिकल हॉस्पिटलमधील धक्कादायक प्रकार

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 29 जून 2018

नागपूरच्या मेडिकल हॉस्पिटलमध्ये रूग्णाकडून फरशी पुसून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. झालेल्या प्रकारामुळं मेडिकल कॉलेजविरोधात संताप व्यक्त केला जातोय.

हिमोग्लोबीन कमी झाल्यानं नागपूरच्या मेडिकल हॉस्पिटलमध्ये रोशन हिवरकर यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांना ज्या वॉर्डमध्ये दाखल केलं होतं त्या व़ॉर्डमध्ये कमालीची अस्वच्छता होती. ही बाब रोशन यांनी सफाई कर्मचाऱ्याला सांगितलं. त्यानं सफाई करण्यास नकार दिला. नाईलाज म्हणून रोशन यांनी खाटेवर खाली उतरून खाटेशेजारच्या परिसराची सफाई केली.

रुग्णाच्या साफसफाईचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या प्रकरणी मेडिकल हॉस्पिटलचं प्रशासन काहीही बोलण्यास तयार नाही. ज्या हॉस्पिटलमध्ये रूग्णाला फरशी साफ करावी लागत असेल त्या हॉस्पिटलमध्ये किती अनागोंदी माजलीय हे यावरून अधोरेखित झालंय.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live