युवतीला युरोप आणि दुबईत नेऊन केला बलात्कार; नागपूर पोलिसांनी शिक्षिकेच्या तक्रारीवरून गुन्हा केला दाखल

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 8 फेब्रुवारी 2019

नागपूर - शिक्षक युवतीला प्रियकर कापड व्यापारी जेटानंद ऊर्फ जय सुरेशकुमार नारायणी (३२, रा. सिंधी कॉलनी, खामला) या युवकाने युरोप आणि दुबईत नेऊन बलात्कार केला. प्रतापनगर पोलिसांनी शिक्षिकेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.

नागपूर - शिक्षक युवतीला प्रियकर कापड व्यापारी जेटानंद ऊर्फ जय सुरेशकुमार नारायणी (३२, रा. सिंधी कॉलनी, खामला) या युवकाने युरोप आणि दुबईत नेऊन बलात्कार केला. प्रतापनगर पोलिसांनी शिक्षिकेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.

सोमलवाड्यात राहणारी २६ वर्षीय युवती ऊर्वशी (बदललेले नाव) ही शिक्षिका असून, दुबईतील इंडियन स्कूलमध्ये नोकरीवर आहे. नागपूरमध्ये असताना २०१४ ला खामल्यातील जेटानंद नारायणी याच्या गिफ्ट ॲण्ड आर्टिकल्स दुकानात गेली होती. ऊर्वशीने महागडे गिफ्ट घेतल्यामुळे जेटानंदने बिलावर टाकण्यासाठी तिचा मोबाईल क्रमांक घेतला होता. ‘स्पेशल ग्राहक’ म्हणून गिफ्ट लागल्याचा बनाव करून आठ दिवसांनी जेटानंदने ऊर्वशीला दुकानात बोलावले. तिला सरप्राइज गिफ्ट म्हणून महागडी घड्याळ दिली. तेव्हापासून दोघांमध्ये मैत्री झाली. जेटानंद रोज फोन व मॅसेज करीत जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत होता. जेटानंदचे वाडी परिसरात कपड्याचे मोठे दुकान आहे. त्याने ऊर्वशीला कापडाच्या दुकानात नेले आणि येथेच्छ खरेदी करण्यास मुभा दिली. बिल नाकारून तिच्या मनात घर केले. लखपती असलेल्या ऊर्वशीला काही दिवसांतच ‘प्रपोज’ केले आणि लग्नाची मागणी घातली.

२०१७ मध्ये तिला दुबईत नोकरी लागली. तिने मुलाखतीला जात असताना जेटानंदलाही सोबत नेले. दुबईत जेटानंदने लग्नाचे आमिष दाखवून ऊर्वशीवर बलात्कार केला. त्याने काही अश्‍लील छायाचित्रेही काढली. त्यानंतर तिला युरोपला नेले व शारीरिक संबंध प्रस्थापित केले. ऑक्‍टोबर २०१८ पर्यंत त्याने लग्नाचे आमिष दाखवून शहरातील पंचतारांकित हॉटेल्समध्ये ऊर्वशीवर बलात्कार केला; मात्र लग्नास नकार दिला. ऊर्वशीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

Web Title: Man took a teacher to abroad and raped her


संबंधित बातम्या

Saam TV Live