मुलाला पीए बनवून नागपूरच्या महापौर विदेश दौऱ्यावर; गेल्या दोन वर्षांतील त्यांचा हा महापौर म्हणून सहावा विदेश दौरा  

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 16 सप्टेंबर 2018

मुलाला पीए बनवून नागपूरच्या महापौर विदेश दौऱ्यावर गेल्याचं समोर आलंय.  
महापौर नंदा जिचकार या स्वत:च्या मुलाला खासगी सचिव बनवून विदेश दौऱ्यावर गेल्या आहेत.

मनपा कायद्यात महापौरांना खासगी पीए देण्याची तरतूद नाही. त्यांना स्वत:च्या पातळीवर खासगी पीए ठेवता येतो. मनपा महापौरांना सरकारी पीए देते. मात्र, सॅनफ्रान्सिस्को येथे जाताना महापौरांनी त्यांच्या मुलालाच पीए पदावर दाखविले आहे. आयोजक संस्थेने युनायटेड स्टेटच्या ऍम्बेसीतील कॉन्सुलेट जनरलला व्हिसासाठी माहितीस्तव दिलेल्या पत्रात स्पष्टपणे तसे नमूद केले आहे. 

दरम्यान, गेल्या दोन वर्षांतील त्यांचा हा महापौर म्हणून सहावा विदेश दौरा आहे. कॅलिफोर्नियातील 'ग्लोबल कोव्हेनन्ट ऑफ मेयर्स फॉर क्लायमेट ऍण्ड एनर्जी' या संस्थेतर्फे आयोजित परिषदेत सहभागी झाल्यात. यावेळी त्यांनी त्यांचा मुलगा प्रियेश यालाही सोबत नेले. प्रियेश हा या दौऱ्यात नागपूर महापालिकेच्या महापौर नंदा जिचकार यांचा खासगी सचिव असल्याची नोंद आहे. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live