MIM बरोबरच्या युतीबाबत प्रकाश आंबेडकर म्हणाले...

MIM बरोबरच्या युतीबाबत प्रकाश आंबेडकर म्हणाले...

​नागपूर : एमआयएमच्या प्रमुखांसोबत बोलणे झाले आहे. त्यामुळे आमची युती कायम आहे. जागा वाटपाचा विषय अद्याप गुलदस्त्यात असून, त्यावर अंतिम निर्णय झालेला नाही, असे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. 

गड किल्ले संदर्भात सरकारवर टीका करत, ते म्हणाले, सरकार दरोड्या व्यक्तीप्रमाणे आहेत. त्यांच्याकडे विकायला काही नसल्याने ते आता गडकिल्लेच विकायला निघालेत. सरकार आरक्षण विरोधी असल्याने नोकरभरतीत अनुसूचित जाती आणि जमातीला डावलण्यात येत आहे, असा आरोप आंबेडकर यांनी केला आहे.

वंचित आघाडीतून 'एमआयएम'बाहेर पडल्याचे वृत्त वंचित बहुजन आघाडीने फेटाळून लावत 'एमआयएम'चे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्याकडून युती तोडण्याबाबत जाहीर केले जात नाही, तोपर्यंत युती कायम असल्याची भूमिका वंचित आघाडीने घेतली होती.

"एमआयएम'चे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार इम्तियाज जलील यांनी युती तोडण्याच्या केलेल्या घोषणेची दखल घेतली जात नसल्याचे "वंचित'ने थेट स्पष्ट केल्याने "एमआयएम'चे राज्यातील नेतृत्व आणि वंचित आघाडीच्या नेत्यांमध्ये विस्तवही जात नसल्याचेही यामुळे चव्हाट्यावर आले होते. अखेर आंबेडकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे.


Web Title: Our Alliance with MIM are Fixed says Prakash Ambedkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com