पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये व्हावे यासाठी भाजप आग्रही

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 19 एप्रिल 2018

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ४ जुलैला नागपूरमध्ये घेण्याचा निर्णय मंत्री समितीने घेतलाय. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर त्या संदर्भात पुढील आठवड्यात अधिकृत घोषणा होणार असल्याचे सांगण्यात आलं आहे. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये व्हावे यासाठी भाजप आग्रही आहे. यासंदर्भात विधिमंडळातील विविध पक्षांच्या गटनेत्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यासाठी मंत्री समिती नेमण्यात आली आहे.

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ४ जुलैला नागपूरमध्ये घेण्याचा निर्णय मंत्री समितीने घेतलाय. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर त्या संदर्भात पुढील आठवड्यात अधिकृत घोषणा होणार असल्याचे सांगण्यात आलं आहे. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये व्हावे यासाठी भाजप आग्रही आहे. यासंदर्भात विधिमंडळातील विविध पक्षांच्या गटनेत्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यासाठी मंत्री समिती नेमण्यात आली आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट हे सदस्य असलेल्या या समितीची मंगळवारी मंत्रालयात बैठक झाली आणि पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये घेण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. 


संबंधित बातम्या

Saam TV Live