मोहन भागवत पण म्हणतात, 'मोदी है तो मुमकिन है'!

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 16 ऑगस्ट 2019

नागपूर : कलम 370 रद्द व्हावे हा भारतीयांचा संकल्प होता. त्यासाठी इच्छाशक्ती असलेले नेतृत्व महत्वाचे आहेच. 'मोदी है तो मुमकिन है' असे लोक बोलतात ते चूक नाही,' असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले. 

नागपूर येथील संघ मुख्यालयात आज डॉ. मोहन भागवत यांच्या उपस्थितीत सरकार्यवाह भैयाजी जोशी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्या प्रसंगी सरसंघचालक बोलत होते. 'देश स्वतंत्र होण्यासाठी ज्यांनी-ज्यांनी प्रयत्न केले, त्या सगळ्यांचे आज स्मरण करायला हवे. 'कलम 370' हटविण्याचा संकल्प संपूर्ण समाजाचा होता. असे संकल्प करण्याचा आज दिवस आहे,' असे सरसंघचालक म्हणाले. 

इम्रान खाननी हिंदू समाजाला ललकारले आहे : भैय्याजी जोशी
काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी संघाची तुलना हिटलरशाहीशी केली होती. यावर भय्याजी जोशींनी सडकून टीका केली आहे. 'पाकिस्तानी पंतप्रधानांनी एक प्रकारे संपूर्ण हिंदू समाजाला ललकारले आहे. सरकार याचं योग्य उत्तर देईल.' असा विश्वास जोशी यांनी व्यक्त केला.

Web Title: RSS chief Mohan Bhagwat praises PM Narendra Modi

संबंधित बातम्या

Saam TV Live