नागपुरात मिनरल वॉटरचा गोरखधंदा

संजय डाफ साम टीव्ही नागपूर
शुक्रवार, 21 जून 2019

वाढदिवस असो की लग्न सोहळा पिण्यासाठी शुद्ध पाणी म्हणून तुम्ही मिनरल वॉटर मागवू नका. कारण मिनरल वॉटर म्हणून जे विकलं जातंय ते शुद्ध असेलच याची खात्री नाही. नागपुरात मिनरल वॉटर कंपन्यांचा गोरखधंदा सुरु आहे. शुदध पाणी म्हणून अशुद्ध पाण्याची बिंदधास्त विक्री सुरु आहे. 

नागपुरात एक दोन नाहीत तर तब्बल 132  मिनरल वॉटर कंपन्या आहेत. यातील फक्त 21 कंपन्यांकडे महापालिकेचे नाहारकत प्रमाणपत्र आहे. याचा अर्थ 111 कंपन्या बेकायदेशीर असून पालिका त्याकडे दुर्लक्ष करतंय.

आरओ पाणी विक्रेत्यांना मनपाच्या झोनस्तरावर परवानगी दिली जाते. पाणी अशुद्ध असेल तर संबंधित कंपनीवर किरकोळ कारवाईचा अधिकार मनपाला आहे. विशेष म्हणजे पाण्याचा शुद्धतेसंदर्भात चाचणी करणारी यंत्रणा असली तरी ती अपुरी पडताना दिसतंय. त्यामुळं अशा कंपन्याचं फावतं. ते शुद्ध पाणी म्हणून अशुद्ध पाणी ग्राहकांच्या माथी मारतात. स्वत:चा खिसा भरण्यासाठी नागरिकांच्या आरोग्याशी असा खेळ सुरुये. 

त्यामुळं तुम्ही सावध व्हा, मिनरल वॉटर पाणी विकत घेण्याची वेळ आली तर सर्व पडताळणी करुनच पाणी विकत घ्या.

Webtitle :marathi news Nagpur sale of contaminated mineral water health 

संबंधित बातम्या

Saam TV Live