(video) नागपूरमध्ये पाकिटमार चोराला आरपीएफने 26 सेकंदात केली अटक 

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 7 ऑक्टोबर 2018

नागपूर रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी अवघ्या 26 सेकंदात चोरट्याला जेरबंद करत अनोखा विक्रम नोंदवलाय. सीसीटिव्हीच्या मदतीन आरपीएफनं ही कामगिरी केलीय.

केवळ चारच मिनिटात मोबाईल चोराच्या मुसक्या आवळण्याची दोनच दिवसांपूर्वींची कर्तबगारी या घटनेमुळे मागे पडलीय. सुनील कुमार राय असं या चोरट्याचं नाव आहे.  राय रेल्वेस्थानकावर आल्यावर त्याच्या संशयास्पद हालचालींमुळे सीसीटीव्ही कक्षातून त्याच्यावर पाळत ठेवण्यात आली. तो सामान्य प्रतीक्षालयात गेला आणि झोपेत असलेल्या प्रवाशाच्या खिशातून त्यानं पाकीट काढलं.

या चोरट्यानं 5 वाजून 35 मिनीट आणि 14व्या सेकंदाला पाकीट चोरले आणि आरपीएफनं 5 वाजून 35 मिनिटे आणि 40 व्या सेकंदाला झडप घालून त्याच्या मुसक्या आवळल्या. रेल्वे पोलिसांच्या या कामगिरीचं चांगलंच कौतुक होतंय. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live