Loksabha 2019 : राजकारणात कोणासोबतही शत्रूत्त्व नाही : गडकरी

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 14 मार्च 2019

नागपूर : माझे सर्वांसोबत चांगले संबंध आहेत. राजकारणात माझे कोणासोबतही शत्रूत्त्व नाही. नाना पटोले भाजपमधून बाहेर पडले असलेतरीही त्यांच्यावर आशीर्वाद कायम राहतील, असे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी आज (गुरुवार) सांगितले. तसेच मी जे पाच वर्षांत काम केले. त्याच्याच आधारावर लोकांसमोर जाऊन त्यांचा आशीर्वाद मागणार आहे, असेही ते म्हणाले. 

नागपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत गडकरी बोलत होते. ते म्हणाले, ''राजकारणात प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. मग कोणताही उमेदवार असेल. मात्र, मी कोणावरही वैयक्तिक टीका करणार नाही. काँग्रेसला आपला उमेदवार ठरवण्याचा अधिकार आहे. जो उमेदवार असेल त्याने लढावे. पटोलेंना नागपुरातून उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यांना माझ्याकडून शुभेच्छा''. 

तसेच ते पुढे म्हणाले, ''राजकारणात प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. त्यामुळे त्याने निवडणूक लढवावी. मी जनतेसमोर जाऊन त्यांचा आशीर्वाद मागणार आहे''.

Web Title: There is no animosity with anyone in politics says Nitin Gadkari

संबंधित बातम्या

Saam TV Live