प्रदुषणाने डोंबिवलीतील नाला झाला हिरवा, निळा.. याकडे कुणी लक्ष देणार का ? 

कल्पेश गोरडे, साम टीव्ही, डोंबिवली
सोमवार, 24 जून 2019

संथ वाहणारं हिरवं निळं पाणी, पाण्याला येणारा उग्र घाणेरडा वास. हा फोटो आहे डोंबिवलीच्या नांदीवली परिसरातला नाला. रविवारी संध्याकाळी अचानक या नाल्याने रंग बदलला. नाल्यातून हिरव्या निळ्या रंगाचे पाणी वाहू लागलं. या पाण्याला येणाऱ्या उग्र आणि घाणेरड्या वासाने श्वास घेणं ही कठिण जात होत. डोंबिवलीकरांना काही क्षण काय झालंय, हेही समजलं नाही. आणि जेव्हा समजलं तेव्हा त्यांच्या तोंडचं पाणीच पळालं.

हा नाला डोंबिवली एमआयडीसी परिसरातून वाहत येतो. त्यामुळे एमआयडीसीतल्या एखाद्या रासायनिक कंपनीने प्रक्रिया न करता रासायनिक सांडपाणी नाल्यात सोडल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय.

या हिरव्या,निळ्या पाण्याने 2014मध्ये डोंबिवलीत झालेल्या हिरव्या पावसाची आठवण करुन दिली. हिरव्या पावसानंतर एमआयडीने सर्व कंपन्यांना केमिकलयुक्त पाण्यावर प्रक्रियाकरुन सोडण्याचे आदेशही दिले मात्र कंपन्यांकडून आदेशाला केराची टोपली दाखवल्याचाच प्रकार घडलाय. आता नाल्याला आलेल्या हिरव्या निळ्या पाण्याने प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय.. आता तरी प्रदूषण पसरवणाऱ्या कंपन्यांवर कारवाई होणार का हाच खरा प्रश्न आहे. 

संबंधित बातम्या

Saam TV Live