नालासोपाऱ्यामध्ये अनेक सोसायट्यांच्या तळमजल्यावरील घरात गुडघाभर पाणी

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 9 जुलै 2018

नालासोपाऱ्यामध्ये पावसाने दमदार हजेरी लावली असून परिसरातील मुख्य रस्ते जलमय झाले आहेत. नागरिकांना गुडघाभर पाण्यातून वाट काढावी लागत असून वाहनचालकांचीही चांगलीच त्रेधा उडतेय. सेंट्रल पार्क, ओसवाल नगरी, टाकीपाडा, तुळिंज, रेल्वे ब्रिज तसेच वसईतील आनंद नगर, समता नगर, पूर्वेकडील नवजीवन, सातिवली, धानिव या परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. अनेक सोसायट्यांच्या तळमजल्यावरील घरात गुडघाभर पाणी साचल्याचंही पाहायला मिळतंय.

पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवरही परिणाम 
मुसळधार पावसामुळे पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. विरार-नालासोपारा परिसरात पहाटेपासून पावसाचा जोर कायम असून, नालासोपारा स्थानकातील पाणी थेट रेल्वे रुळांवर आल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. नालासोपाऱ्यातील पावसामुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांवर परिणाम झालाय. मुसळधार पावसामुळे डहाणू स्थानकातच लांब पल्ल्याच्या गाड्या रोखण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचाही चांगलाच खोळंबा झाला आहे. अगदी कासव गतीने गाड्या चालवण्यात येत असून, पश्चिम रेल्वेवरील उपनगरीय सेवा सुमारे 15 ते 20 मिनिटे विलंबाने धावतेय.

ठाणे स्थानकात रुळांवर पाणी
मुसळधाप पावसामुळे ठाणे स्थानकात रुळांवर पाणी साचलंय. मुसळधार पावसामुळे 'मरे'चा खोळंबा झालाय. मध्य रेल्वेची वाहतूक 20 ते 25 मिनिटे उशिराने सुरू आहे.  

संबंधित बातम्या

Saam TV Live