नाना पाटेकर-तनुश्री दत्ता वाद; मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांचे मौन 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 29 सप्टेंबर 2018

मुंबई :  'आशिक बनाया अपने' फेम अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांनी 'हॉर्न ओके प्लीज' या चित्रपटाच्या सेटवर गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे. त्यावर विविध क्षेत्रांतून प्रतिक्रिया उमटल्या; मात्र मराठी चित्रपटसृष्टीने यावर मौन बाळगणेच पसंत केले आहे. यावर प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी मराठीतील काही कलाकार, निर्माते, दिग्दर्शक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. 

नाना पाटेकरांची मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख आहे. 'नटसम्राट' या चित्रपटात पाटेकर यांच्यासोबत काम करणाऱ्या अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिच्याशी संपर्क साधला. ती म्हणाली, 'नाना सर मला वडिलांसारखे आहेत. त्यांचा मी सेटवर अनेक वेळा ओरडा खाल्ला आहे. काम नीट झाले नाही तर ते मला अनेकदा फोन करूनही सांगत; मात्र तनुश्री हिच्यासारखा कोणताही अनुभव मला आतापर्यंत आलेला नाही.' अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि दिग्दर्शक-निर्माते महेश मांजरेकर यांनी काहीही बोलण्यास स्पष्ट नकार दिला. 

WebTitle : marathi news nana patekar tanushree dutta controversy marathi cine world chose to keep mum  

संबंधित बातम्या

Saam TV Live