सावरकरांचा गौरव प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी फेटाळला...

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 26 फेब्रुवारी 2020

मुंबई - आज स्वात्यंत्रवीर सावरकर यांची पुण्यतिथी आहे. अशात महाविकास आघाडीला कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांकडून स्वात्यंत्रवीर विनायक दामोदर सावरकर यांचा गौरव प्रस्ताव मांडण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी गौरव प्रस्ताव फेटाळून लावलाय. विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयानंतर विधानसभेत मोठा गदारोळ झालेला पाहायला मिळाला. विरोधकांकडून बॅनरबाजी आणि घोषणाबाजी देखील देखील करण्यात आली. याबाबतीत बोलताना शिदोरी मासिकावर देखील बंदी घालण्याची मागणी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

मुंबई - आज स्वात्यंत्रवीर सावरकर यांची पुण्यतिथी आहे. अशात महाविकास आघाडीला कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांकडून स्वात्यंत्रवीर विनायक दामोदर सावरकर यांचा गौरव प्रस्ताव मांडण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी गौरव प्रस्ताव फेटाळून लावलाय. विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयानंतर विधानसभेत मोठा गदारोळ झालेला पाहायला मिळाला. विरोधकांकडून बॅनरबाजी आणि घोषणाबाजी देखील देखील करण्यात आली. याबाबतीत बोलताना शिदोरी मासिकावर देखील बंदी घालण्याची मागणी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. दरम्यान हा विषय नियमात बसत नाही म्हणून विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी प्रस्ताव फेटाळत असल्याचं म्हटलंय. 

फडणवीसांकडूनच सावरकरांचा अपमान केला जातोय :

विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीसांकडून स्वात्यंत्रवीर सावरकर यांचा गौरव प्रस्ताव मांडण्यासाठी करण्यात आलेल्या भाषणाला जयंत पाटील यांनी आक्षेप घेतला. स्वात्यंत्रवीर सावरकर यांच्या गौरव प्रस्तावाची मागणी करताना फडणवीसांनी ज्या गोष्टींचा उल्लेख केला, ज्या गोष्टी वाचून दाखवल्यात यामुळे सावरकरांचा अपमान होतोय असं मंत्री जयंत पाटील म्हणालेत. 

सावरकरांना भारतरत्न देणार का ते आधी सांगा ? 

महाराष्ट्राचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी विरोधकांना निशाण्यावर घेत, सावरकरांना भारतरत्न देणार का? ते आधी सांगा असं परब म्हणालेत. याबाबतीत नितेश राणे यांचं मत देखील घ्यावं, त्यांना प्रस्ताव मांडायला सांगा. सावरकरांना भारतरत्न द्यायचा का नाही याचा आधी निर्णय घ्या, त्यानांतर तुमच्या अभिनंदनाचा प्रस्ताव सरकार मांडेल असं म्हणालेत. 

सावरकरांना भारतरत्न द्या - अजित पवार 

सभागृहात बोलताना विनायक दामोदर सावरकरांना भारतरत्न द्यावा असं विधान राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय. सावरकरांच्या कार्याबद्दल कुणाचं दुमत असण्याचं कारण नाही. सावरकरांबाबतच्या काही गोष्टींमध्ये दुमत असू शकतं. जेवढ्या व्यक्ती तेवढी मतं असू शकतात. सर्वांनी प्रयत्न करून सावरकरांना भारतरत्न देण्यात यावा असं अजित पवार म्हणालेत.

nana patole rejects the demand of opposition of having pride proposal of vir savarkar


संबंधित बातम्या

Saam TV Live