VIDEO | नाणारमध्ये सेना विरूद्ध सेना

अमोल कलये.साम टीव्ही रत्नागिरी
सोमवार, 2 मार्च 2020

नाणार रिफायनरी विरोधात शिवसेननं जोरदार शक्तीप्रदर्शन करत या प्रकल्पाला आपला विरोधच असल्याचं दाखवून दिलय..नाणार जवळच्या कात्रादेवी गावातल्या मैदानात हा विरोधी एल्गार मेळावा घेतला गेला. यावेळी  नाणार रिफायनरी विरोधात दलाली करणाऱ्यांना चपलेनं झोडा असा खुलं आव्हान शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी जाहीर सभेतून दिलं. तर नाणार रिफायनरीला समर्थन करणाऱ्या शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्या मंदा शिवलकर यांची पक्षातून हाकालपट्टी करण्यात आल्याची घोषणा त्यांनी या सभेत केली. नाणार रिफायनरीच्या समर्थनात जो कुणी शिवसेनेचा भगवा किंवा गमचा घेऊन जाईल त्याच्यावर कडक कारवाईचा इशाराही राऊत यांनी दिलाय. 

 

 आता नेत्यांनी दिलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर नाणार समर्थक शिवसैनिक कोणती भूमिका घेतात याकडेच सर्वांचं लक्ष लागलंय. 

webTittle :: Army against army in Nanar


  


संबंधित बातम्या

Saam TV Live