नाणारवर शिक्कामोर्तब, तीन लाख कोटी रुपयांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 26 जून 2018

नवी दिल्ली : शिवसेनेच्या विरोधाला अजिबात न जुमानता केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने रत्नागिरीजवळचा नाणार येथील तीन लाख कोटींचा "आरआरपीसीएल' पेट्रोलियम शुद्धीकरण प्रकल्प रेटला आहे. याबाबत "सौदी आरामको' व आबूधाबी राष्ट्रीय तेल कंपनीबरोबर (एडीएनओसी) केंद्राने आज एक सामंजस्य करारही करून टाकला. करारावर स्वाक्षऱ्या केल्यावर केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायूमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी, "प्रकल्पाच्या विरोधाच्या मुद्द्यावर मी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लवकरच भेटून चर्चा करेन,' असे सांगून हा विषय संपविला.

नवी दिल्ली : शिवसेनेच्या विरोधाला अजिबात न जुमानता केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने रत्नागिरीजवळचा नाणार येथील तीन लाख कोटींचा "आरआरपीसीएल' पेट्रोलियम शुद्धीकरण प्रकल्प रेटला आहे. याबाबत "सौदी आरामको' व आबूधाबी राष्ट्रीय तेल कंपनीबरोबर (एडीएनओसी) केंद्राने आज एक सामंजस्य करारही करून टाकला. करारावर स्वाक्षऱ्या केल्यावर केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायूमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी, "प्रकल्पाच्या विरोधाच्या मुद्द्यावर मी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लवकरच भेटून चर्चा करेन,' असे सांगून हा विषय संपविला. नाणार प्रकल्पास कोणाचीही तत्त्वतः असहमती वा विरोध नाही, असाही दावा त्यांनी केला. दरम्यान, नाणार प्रकल्प जसा रेटला, त्याच धर्तीवर सरकार महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेनबाबतही ठाम भूमिका घेणार याचेही संकेत यातून मिळत आहेत. 

रत्नागिरी येथील ग्रीन फील्ड रिफायनरी व पेट्रोकेमिकल प्रकल्पाच्या उभारणीसाठी "सौदी अरामको' आणि "एडनॉक' या कंपन्यांमध्ये तीन लाख कोटींच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. रत्नागिरी रिफायनरी व पेट्रोकेमिकल्स लिमिटेडच्या (आरआरपीसीएल) वतीने उभारण्यात येणाऱ्या ग्रीन फील्ड रिफायनरी व पेट्रोकेमिकल प्रकल्पासाठी "सौदी अरामको' कंपनीचे अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी अमीन एच. नसीर, संयुक्त अरब अमिरातीचे (यूएई) राज्यमंत्री व एडनॉक समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुलतान अहमद अल जबेर यांनी धर्मेंद्र प्रधान आणि सौदी अरेबियाचे परराष्ट्रमंत्री शेख अब्दुल्ला बिन जायेद बिन सुलतान अल नहयान यांच्या उपस्थितीत एका करारावर स्वाक्षऱ्या केल्या. 

प्रकल्पाच्या विरोधाच्या मुद्द्यावर मी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लवकरच भेटून चर्चा करेन. प्रकल्पाला तत्त्वतः असहमती नाही; पण या भागातील शेतकऱ्यांबाबतचे काही चिंतेचे मुद्दे आहेत ते चर्चेने सुटतील. 
- धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायूमंत्री 


संबंधित बातम्या

Saam TV Live