निवडणुकीच्या काळात कर्तव्य न बजावलेल्या 11 पोलिसांवर गुन्हा

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 7 मे 2019

नांदेड : निवडणुकीच्या या महत्त्वाच्या कामात कसूर करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याच्या जिल्हा विशेष शाखेच्या फौजदारास सूचना दिल्या. त्यावरून सोमवारी सायंकाळी वजिराबाद पोलिस ठाण्यात लोकप्रतिनिधी अधिनियम 1951 चे कलम 134 एक नुसार अकरा पोलिस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याच्या मतदानासाठी नांदेड पोलिस दलाच्या वतीने सातारा येथे 250 पोलिस कर्मचारी 20 एप्रिल रोजी पाठविण्यात आले होते. परंतु यापैकी 11 पोलिस कर्मचारी कर्तव्यावर हजर झाले नसल्याचे पत्र सातारा पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून नांदेड पोलिसांना मिळाले. यावरून पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी यात विशेष लक्ष घातले.

गुन्हा दाखल झालेल्या कर्मचार्‍यांना गुलाब आडे पोलिस ठाणे हिमायतनगर, कृष्णा चंनोडे, बाबुराव सूर्यवंशी देगळुर, वजीराबादचे हजुरिया, कंधारचे विजय धुळगंडे, वाहतूक शाखेचे सादिक पठाण, मोनहर हुसेन, शिवाजीनगरचे गोपाळ तोटलवार, लिमगावचे देवानंद मोरे, मुखेडचे राजू कांबळे आणि विमानतळ पोलिस ठाण्याचे मिलिंद लोने यांचा यात समावेश आहे.

Web Title: case filed against police constables in Nanded

संबंधित बातम्या

Saam TV Live