नांदेडमध्ये पावसाचं थैमानं, पुराच्या पाण्यात 6 जण गेले वाहून; चौघांचे मृतदेह सापडले

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

नांदेडमध्ये २ वेगवेगळ्या घटनांमध्ये ४ जण काल रात्री वाहून गेलेत. या चौघांचाही मृत्यू झालाय. या दुर्घटनेत गंगाधर दिवटे, पत्नी पारूबाई दिवटे आणि त्यांची 8 वर्षाची मुलगी असे तीघेजण वाहून गेले. बरबड़ा येथे बहिणीच्या घरी जेवण करून घराकडे परतत असताना ही दुर्दैवी घटना घडली.

अंधार असल्याने आणि पाण्याच्या वेगाचा अंदाज न आल्याने ही तवेरा गाडी प्रवाहामुळे नाल्यात फेकली गेली. गाडीतून बाहेर पडण्याची संधी न मिळाल्याने  गाडीतच या सर्वांचा मृत्यू झाला असावा असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

तीघांचेही मृतदेह आज सकाळी सापडले असुन, मृतदेह नायगावच्या शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले आहेत. 

दरम्यान,  दुसऱ्या एका घटनेत नायगाव तालुक्यातीलच बेंद्री गावाजवळ नाल्यावरून जात असताना विनायक गायकवाड हा तरुण वाहून गेलाय. या तरुणाचाही मृत्यू झालाय. तर नांदेडमध्ये ओढ़याला आलेल्या पुरात काल वाहून गेलेल्या दोन शेतकऱ्यांचा अद्याप शोध लागलेला नाही. मारोती बिरकुले आणि भारत तोडकर अशी पुरात वाहून गेलेल्यांची नावं आहेत.

जीवरक्षकांच्या मदतीने आज सकाळपासून पुन्हा शोधकार्य सुरू आहे. सलग तिसऱ्या दिवशीही पावसाची रिपरिप सुरू आहे. 

WebTitle : marathi news nanded heavy rains floods six missing four found dead 

संबंधित बातम्या

Saam TV Live