नांदेड जिल्ह्यातील शाळेच्या खिचडीत शिजला साप 

नांदेड जिल्ह्यातील शाळेच्या खिचडीत शिजला साप 

नांदेड- आजपर्यंत आपण जिल्हा परिषदेच्या शाळेतील गलथान कारभारामुळे खिचडीत पाल, उंदीर, मांजर पडून विषबाधा झाल्याच्या घटना ऐकल्या असतील मात्र, नांदेड जिल्ह्यातील शाळेच्या खिचडीत चक्क साप शिजल्याने एकच खळबळ उडाली आहे.

हदगाव तालुक्यातील गारगव्हाण येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत काल हा धक्कादायक प्रकार घडला. खिचडी खात असताना एका विद्यार्थ्यांच्या ताटात हा साप अढळला. विद्यार्थ्यांने शिक्षकांना ही बाब सांगताच विद्यार्थ्यांना खिचडी न खान्याचा सल्ला शिक्षकांनी दिला आणि खिचडीची विल्हेवाट लावली.

विद्यार्थ्याने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे शाळा प्रशासनाने सांगितले. दरम्यान, शाळेच्या गलथान कारभारावर पालकांनी तिव्र नाराजी व्यक्त करत दोषीं विरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. घटनेची माहिती मिळताच नांदेड च्या शिक्षण विभागाचे पथक शाळेत दाखल झाले आणि चौकशी सुरू केली आहे.

Web Title: Snake found in the food of school students

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com