एकाच मंडपात त्याने केले दोघींशी लग्न

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 5 मे 2018

नांदेड : एखाद्या व्यक्तीचे चौथे लग्न किंवा एकाला पाच सहा बायका असल्याचे आपण आजपर्यंत ऐकले आहे, पण, एकाच मंडपात दोघींशी विवाह ही बाब कधी ऐकली ही नसेल.... मात्र अशी कधी न ऐकलेली आणि न पाहिलेले लग्न नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील सरमाळा येथे झाले आहे. साईनाथ उरेकर याने बिलोली तालुक्यातील कोटग्याळ येथील धुर्पताबाई आणि राजश्री शिरगीरे दोन सख्या बहिणीशी विवाह केला, तोही एकाच वेळी आणि एकाच मंडपात.

धुर्पताबाई ही गतीमंद असल्याने लहान बहिण राजश्री हिने माझ्याशी लग्न करायचे असेल तर माझी मोठी बहिण धुर्पताबाईशी एकाच मंडपात लग्न करण्याची अट घातली. साईनाथने ही अट मान्य करत दोघींशी विवाह केला. दोन दिवसांपूर्वी झालेल्या या विवाहाचे फोटो आणि लग्नाची पत्रिका देखील सोशल मिडीयावर व्हायरल झाली आहे. हिंदुधर्मात बहु विवाह पध्दत रुढ नाहि. एक पत्नी असताना दुसरीशी विवाह करणे हा कायद्याने गुन्हा मानला जातो. साईनाथने केलेल्या दोन बहिणींशी विवाह करत दाखवलेल्या धाडसाचे कौतुक होत आहे. विशेष म्हणजे काँग्रेसचे माजी आमदार रावसाहेब अंतापूरकर यांनी ही विवाहसोहळ्यास हजेरी लावत नवदाम्पत्यांना आशिर्वाद दिला.

दरम्यान, आपल्या लग्नानंतर गतीमंद बहिणीची हेळसांड होऊ नये. यासाठी दोघींशी लग्नाची अट घालणाऱ्या कलियुगात बहिणीच्या प्रेमाचं कौतुक ही सर्वत्र होत आहे.

संबंधित बातम्या

Saam TV Live