नारायण राणे स्वबळावर लोकसभा निवडणूक लढणार 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 22 जानेवारी 2019

राज्यात युतीची चर्चा पुन्हा जोर धरु शकण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत. भाजपकडून राज्यसभेवर निवडून गेलेले नारायण राणे स्वबळावर लोकसभा निवडणूक लढणार असल्याचं स्पष्ट झालंय. 

नारायण राणेंचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष लोकसभेच्या रिंगणात उतरणार असून याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे यांच्यात याबाबत चर्चा पार पडली. या बैठकीत शिवसेनेसोबत युती झाल्यास राणेंनी स्वबळावर लढण्याचा इशारा दिला होता.

राणेंच्या इशाऱ्यानंतरही भाजप यूतीच्या भूमिकेवर ठाम असल्याने अखेरीस राणेंनी स्वबळाच्या भाषेचा पुनरूच्चार केला. नारायण राणेंच्या या भूमिकेमुळे युतीच्या चर्चेतील पहिला अडथळा दूर झाल्याचं मानलं जातंय. 

संबंधित बातम्या

Saam TV Live