नारायण राणे यांचं शिवसेनेला खुलं आव्हान

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2018

शिवसेनेचा नाणार प्रकल्पाला विरोध आहे हे सिद्ध करून दाखवा. मी राजकीय जीवनातून निवृत्त होईन असं म्हणत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी शिवसेनेला खुलं आव्हान दिलंय. राजापूर तालुक्यातील नाणार परिसरात येवू घातलेल्या पेट्रोकेमिक प्रकल्पाला विरोध दर्शवण्यासाठी नारायण राणेंनी सागवे कात्रादेवी येथे एक सभा घेतली त्या सभेत ते बोलत होते. हा प्रकल्प मोदी-अमित शहांनी आणला, असं विनायक राऊत सांगतात, पण नाणार कुठे ते त्यांना माहीत आहे का? असा सवाल त्यांनी विचरलाय, हा प्रकल्प आंध्रमध्ये जात होता, तो याच विनायक राऊत यांनी राजापुरात आणला असाही आरोप त्यांनी केलाय.

संबंधित बातम्या

Saam TV Live