नारायण राणेंना मंत्रीपद नाहीच, राज्‍यसभेवरच बोळवण होणार ?

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

माजी मुख्‍यमंत्री नारायण राणे यांना राज्‍यात मंत्रीपद देणं भाजपला महागात पडणार आहे. यासाठी शिवसेनेचा राणे यांच्‍या नावाला असलेला कडवा विरोध हे प्रमुख कारण आहे. पण नारायण राणे यांनी एनडीएमधे सहभागी होऊन भाजपला बळ देण्‍याचं काम केलंय. त्‍याची पोच देण्‍याची नैतिक जबाबदारी भाजपवर येऊन पडलीय. त्‍याच जबाबदारीचा भाग म्‍हणून भाजप आता नारायण राणे यांना राज्‍यसभेवर पाठवून त्‍यांची बोळवण करण्‍याचं ठरवल्‍याचं सांगण्‍यात येत आहे.

माजी मुख्‍यमंत्री नारायण राणे यांना राज्‍यात मंत्रीपद देणं भाजपला महागात पडणार आहे. यासाठी शिवसेनेचा राणे यांच्‍या नावाला असलेला कडवा विरोध हे प्रमुख कारण आहे. पण नारायण राणे यांनी एनडीएमधे सहभागी होऊन भाजपला बळ देण्‍याचं काम केलंय. त्‍याची पोच देण्‍याची नैतिक जबाबदारी भाजपवर येऊन पडलीय. त्‍याच जबाबदारीचा भाग म्‍हणून भाजप आता नारायण राणे यांना राज्‍यसभेवर पाठवून त्‍यांची बोळवण करण्‍याचं ठरवल्‍याचं सांगण्‍यात येत आहे. राणे यांना राज्‍यसभेवर पाठवायचं आणि शिवसेनेचा राज्‍यातला विरोध मोडून काढायचा असा डबल गेम खेळण्‍याचा निर्णय भाजप श्रेष्‍ठींनी घेतल्‍याचं राजकीय निरीक्षकांचं म्‍हणणंय. 

राणे यांना राज्‍य मंत्रिमंडळात सामावून घेणं शिवसेनेच्‍या विरोधामुळं अडचणीचं ठरणार आहे आणि राणेंनाही फार काळ आशेवर ठेवणं परवडणारं नाही, असंच भाजपश्रेष्‍ठींचं मत आहे. यामुळंच राज्‍य मंत्रिमंडळात राणेंची वर्णी न लावता त्‍यांना राज्‍यसभेवर निवडून आणून त्‍यांचं तात्‍पुरतं का होईना समाधान करण्‍याचं धोरण भाजपला जास्‍त सोईचं वाटतंय. त्‍यामुळंच हा निर्णय घेण्‍यात आल्‍याचं विश्‍वसनीय सूत्रांचं म्‍हणणंय. या धोरणावर शिक्‍कामोर्तब करण्‍यासाठी भाजपचे राज्‍यातले प्रमुख नेते केंद्रीय नेत्‍यांच्‍या संपर्कात असल्‍याचंही सांगण्‍यात येत आहे.


संबंधित बातम्या

Saam TV Live