नारायण राणे यांनी भाजपची राज्यसभेवर जाण्याची ऑफर स्वीकारली ?

नारायण राणे यांनी भाजपची राज्यसभेवर जाण्याची ऑफर स्वीकारली ?

नारायण राणे यांनी भाजपची राज्यसभेवर जाण्याची ऑफर स्वीकारली असल्याचं सूत्रांकडून समजतंय. भाजपतर्फे राज्यसभेच्या तीन जागांपैकी एका जागेसाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी शुक्रवारी अर्ज भरलाय. आता दुसऱ्या जागेसाठी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे अखेर अर्ज भरण्यास तयार झाले आहेत. राज्य मंत्रिमंडळात येण्यास राणे इच्छुक होते, मात्र राज्यसभा वगळता इतर पर्याय शक्य नसल्याचे राणे यांना कळवण्यात आले. त्यामुळे आता दुसरा मार्ग नसल्याने राणे राज्यसभेसाठी तयार झाले असल्याचं सूत्रांकडून समजतंय. त्याचबरोबर तिसऱ्या जागेसाठी भाजपने ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांना गळ घातल्याचीही सुत्रांची माहिती आहे. मात्र खडसे हे देखील राज्यातच राहण्यास इच्छुक आहेत. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com