उद्धव ठाकरेंचा फसवा चेहरा महाराष्ट्रासमोर येतोय - नारायण राणे

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 21 डिसेंबर 2019

नागपूर : बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राला हिंदुत्वाची शिकवण दिली अन्‌ उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाचीच फसणवूक केली. शिवसेनेचे मतदान हिंदू विचारधारेचे आहेत. मात्र, मुख्यमंत्रिपदासाठी आघाडी करणारे उद्धव ठाकरे हे सोनिया गांधींना स्वत:ची ओळख हिंदुत्ववादी म्हणून करवून देणार का, असा सवाल खासदार नारायण राणे यांनी केला आहे. उद्धव ठाकरेंचा फसवा चेहरा महाराष्ट्रासमोर येतो आहे. मला चिंत वाटते, असे देखील नारायण राणे म्हणाले. 

नागपूर : बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राला हिंदुत्वाची शिकवण दिली अन्‌ उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाचीच फसणवूक केली. शिवसेनेचे मतदान हिंदू विचारधारेचे आहेत. मात्र, मुख्यमंत्रिपदासाठी आघाडी करणारे उद्धव ठाकरे हे सोनिया गांधींना स्वत:ची ओळख हिंदुत्ववादी म्हणून करवून देणार का, असा सवाल खासदार नारायण राणे यांनी केला आहे. उद्धव ठाकरेंचा फसवा चेहरा महाराष्ट्रासमोर येतो आहे. मला चिंत वाटते, असे देखील नारायण राणे म्हणाले. 

हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरात आलेल्या खासदार नारायण राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. उद्धव ठाकरेंनी आघाडी करताना राज्यातील जनतेचा विचारच केला नाही. इतकेच काय तर सत्ता मिळाली नाही तरी चालेल, पण हिंदुत्व सोडणार नाही अशी भूमिका घेणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांनाही उद्धव ठाकरेंनी मूठमाती देऊन सरकार अस्तित्त्वात आणले असल्याचे राणे म्हणाले. या सरकारने विद्यार्थी, शेतकरी, बेरोजगार यांच्यासाठी कोणताही विचार केलेला नाही अशीही टीका नारायण राणे यांनी केली. नागपुरातल्या अधिवेशनात त्यांनी हजेरी लावली होती. हे हिवाळी अधिवेशन अधिवेशनच वाटत नाही तर एखादा घरगुती कार्यक्रम वाटतो, अशीही टीका नारायण राणे यांनी केली. 

 

सरकार आल्यानंतर कोणते निर्णय घ्यावेत? कोणते प्रकल्प असावेत? या दृष्टीने प्रयत्न व्हायला हवे होते. कोणत्याही तत्त्वाला, विचारधारेला धरून ही महाविकास आघाडी झालेली नाही. शिवसेना हिंदुत्ववादी विचारांचा पक्ष आहे. शिवसेनेचा जन्मच हिंदूंसाठी झाला. तर कॉंग्रेस धर्मनिरपेक्ष पक्ष आहे. या दोन पक्षांच्या विचाराधारांमध्येच फरक आहे अशीही टीका नारायण राणे यांनी केली. 

जनतेच्या हिताच्या एकही निर्णय नाही

गेल्या पन्नास ते बावण वर्षांपासून ज्या विचारांवर शिवसेना सुरू होती त्या विचारांना व विचारधारेला मूठमाती देण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी केले आहे. व्यक्तिगत स्वार्थासाठी जनतेचा एकही प्रश्‍न सोडवण्यासाठी हे सरकार सत्तेवर आलेले नाही. पाच दिवसांचे हिवाळी अधिवेशन झाले. या पाच दिवसांच्या अधिवेशनात जनतेच्या हिताचा एकही निर्णय या सरकारने घेतलेला नाही. अनेक प्रथा, परंपरा गुंडाळून ठेवण्यात आल्या आहेत, असेही राणे यांनी स्पष्ट केले. 

मुख्यमंत्र्यांची भाषा अशोभनीय

राज्यपालांच्या अभिभाषणानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाषण केले. त्यामध्ये वापरलेली भाषा अशोभनीय होती. आतापर्यंत एकाही मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारची भाषा वापरलेली नव्हती. राज्याला कर्तबगार मुख्यमंत्री मिळायला हवा असे मला वाटते. राज्याच्या विकासाचे प्रश्‍न ज्याला सोडवता येऊ शकतात अशा माणसाला मुख्यमंत्रीपद मिळायला हवे, असेही मत नारायण राणे यांनी व्यक्त केले. 

Web Title: narayan rane says, uddhav thackeray cheated Hindutva


संबंधित बातम्या

Saam TV Live