नारायण राणे नाणार प्रकल्पाबाबत काय म्हणतायत पाहा...

नारायण राणे नाणार प्रकल्पाबाबत काय म्हणतायत पाहा...

मुंबई : कोकणातील नाणार प्रकल्पाबाबत भाजपाची जी भूमिका असेल तीच माझी भूमिका असणार आहे अशी भूमिका माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते नारायण राणे यांनी घेतली आहे. 

शिवसेनेला स्वत: ची कोणतीही भूमिका नाही. शिवसेना नेहमी भूमिका बदलत आलेली आहे. आता सुद्धा नाणार बाबत त्यांनी भूमिका बदलली अशी टीका राणे यांनी शिवसेनेवर केली आहे. 

राणेंनी नाणार प्रकल्पाबाबत मुंबईत माध्यमांशी बोलताना त्यांनी नाणारबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यापूर्वी त्यांनी नाणारला विरोध केला होता. आज मात्र त्यांनी भाजपच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. नाणारबाबत पक्षाची जी भूमिका असेल तीच भूमिका माझी असेल असा खुलासा केला आहे. मात्र दुसरीकडे शिवसेनेवर टीका करण्याची संधीही सोडली नाही. 

दरम्यान, शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या रत्नागिरी आवृत्तीत रिफायनरी बाबत जाहीरात प्रसिद्ध झाली आहे. या जाहीरातीनंतर कोकणात राजकारण चांगलेच तापले आहे. कोकण रिफायनरी प्रकल्प विरोधी संघर्ष संघटनेने सामना कार्यलयाला पत्र देऊन निषेध केला आहे. 

शिवसेनेने रत्नागिरी रिफायनरी बाबत भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी सत्यजित चव्हाण यांनी केली आहे.  

WEB TITLE - NARAYAN RANE'S STATEMENT ABOUT NANAR REFIANARY PROJECT 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com