नरेंद्र दाभोलकरांवर गोळी झाडणाऱ्या आरोपीला अटक; नालासोपाऱ्यातील कारवाईनंतर CBI ला मोठं यश  

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळी झाडणाऱ्या आरोपीला सीबीआयने अटक केली आहे. सचिन अणदुरे असं त्याचं नाव असून त्याला औरंगाबादमध्ये सीबीआयच्या धडक कारवाईत अटक करण्यात आली. 

येत्या 20 ऑगस्ट रोजी दाभोलकरांच्या हत्येला तब्बल 5 वर्षे पूर्ण होत आहेत आणि त्याचवेळी तपास पथकाला पहिला धागा मिळाल्याने आता या हत्येमागच्या कारणांचाही उलगडा होण्याची आशा निर्माण झाली आहे.

20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यातल्या ओंकारेश्वर पुलावर दोन अज्ञात बंदूकधाऱ्यांनी दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. तेव्हापासून आतापर्यंत तपास पथकाला मिळालेलं हे पहिलं यश आहे. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live