मारेकऱ्यांनी का केली नरेंद्र दाभोलकरांची हत्या? 

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 19 ऑगस्ट 2018

डॉ़. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळी झाडणाऱ्या आरोपीला सीबीआयने अटक केली आहे. सचिन अंदुरे असं त्याचं नाव असून त्याला औरंगाबादमध्ये सीबीआयच्या धडक कारवाईत अटक करण्यात आली.

तर जालना शहरातील श्रीकांत पांगरकर या माजी नगरसेवकालाही औरंगाबाद येथील दहशतवादी विरोधी पथकाने ताब्यात घेतलंय. एटीएसनं माजी नगरसेवक श्रीकांत पांगरकर याच्या घराची झडतीही घेण्यात आल्याचे सूत्राकडून कळतंय. झडतीत काय हाती लागले याचा तपशील अजून समजू शकलेला नाही.

मात्र, डॉ नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्याचे धागेदोरे जालना शहरापर्यंत असल्याचं समजताच या कारवाईमुळे शहर एकच खळबळ उडालीय...येत्या 20 ऑगस्ट रोजी दाभोलकरांच्या हत्येला तब्बल 5 वर्षे पूर्ण होत आहेत आणि त्याचवेळी तपास पथकाला पहिला धागा मिळाल्याने आता या हत्येमागच्या कारणांचाही उलगडा होण्याची आशा निर्माण झाली आहे. आतापर्यंत तपास पथकाला मिळालेलं हे पहिलं यश आहे.

संबंधित बातम्या

Saam TV Live