मोदी चौकीदार की जमीनदार ? गांधीनगरमधल्या जमिनीवरून मोदींवर काँग्रेसचा आरोप

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 16 एप्रिल 2019

देशात सध्या लोकसभा निवडणुकीचं वारं वाहतंय. सगळीकडे प्रचार, सभा, आरोप-प्रत्यारोप, टीका-प्रतिटीका अशी धामधूम सुरू आहे. अशातच काँग्रेसनं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच गंभीर आरोप केलाय गुजरातच्या गांधीनगरमधील एका जमीन प्रकरणावरून.

गांधीनगरमधील प्लॉट नंबर 411 ऐवजी प्लॉट नंबर 401/ए च्या एक चतुर्थांश जागेचा मालक मोदी असल्याचं दाखवण्यात आल्याचा आरोप काँग्रेसनं केला. मोदींनी निवडणुकीच्या शपथपत्रात याबाबत खोटी माहिती दिल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते प्रवीण खेरा यांनी केलाय.

निवडणूक आयोगानं या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणीही काँग्रेसनं केलीय. काँग्रेसच्या काळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येतो. आता गांधीनगरमधील जमीन प्रकरणाच्या माध्यमातून पहिल्यांदाच मोदींना काँग्रेसनं लक्ष्य केलंय. काँग्रेसनं केलेल्या या आरोपावर भाजपनं आतापर्यंत तरी प्रतिक्रिया दिलेली नाही. काँग्रेसच्या या आरोपाला भाजपकडून कशी प्रतिक्रिया दिली जातेय याबाबत उत्सुकता आहे. 

Web Title : marathi news narendra modi  gandhinagar land congress allegations

संबंधित बातम्या

Saam TV Live