मोदी, त्यांचा केरळ दौरा आणि बरंच काही.. 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 8 जून 2019

पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच केरळ दौऱ्यावर आलेल्या मोदींची कमळाच्या फुलांनी तुला करण्यात आली. त्याआधी मोदींनी श्रीकृष्ण मंदिरात पूजाही केली. यावेळी पंतप्रधान केरळच्या पारंपरिक पोशाखात दिसले. 

पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच केरळ दौऱ्यावर आलेल्या मोदींची कमळाच्या फुलांनी तुला करण्यात आली. त्याआधी मोदींनी श्रीकृष्ण मंदिरात पूजाही केली. यावेळी पंतप्रधान केरळच्या पारंपरिक पोशाखात दिसले. 

गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान मोदी जसा देश तसा वेश' या युक्तीप्रमाणे ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणाचा पारंपरिक पोषाख करताना दिसतात. लोकसभा निवडणुकीनंतर केदारनाथ मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या मोदींच्या पोशाखाचीही खूप चर्चा झाली. यावेळी पंतप्रधान डोक्यावर टोपी, हातात काठी अशा गढवाली पोशाखात दिसले होते. त्यानंतर त्यांनी  एखाद्या साधूप्रमाणे भगव्या कपड्यात केदारनाथमधील पवित्र गुहेमध्ये ध्यानधारणा केली होती. 

लोकसभा निवडणुकीदरम्यान मोदी ज्या राज्यात प्रचारासाठी जायचे त्या राज्यातील पारंपरिक पोशाख करत होते. अरुणाचल प्रदेशमध्ये मोदींनी तिथली सांस्कृतिक टोपी घातली होती. जम्मू-काश्मीरमध्येही त्यांचा पेहराव चर्चेचा विषय़ ठरला होता. पंतप्रधान मोदी नेहमीच वेळ, ठिकाण,संस्कृती परंपरेनुसार वेशभूषा करतात. मग देशाच्या स्वातंत्र्य दिवसाच्या सोहळ्याला घातलेली पगडी असो की प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात घातलेली पगडी. मोदी आपल्या लूकने सगळ्याचं लक्ष आकर्षित करतात. 

एकूणच काय तर मोदी जैसा देश वैसा भेस करुन तिथल्या जनतेमध्ये आपलुकीचे नातं निर्माण कऱण्याचा प्रयत्न करतात.

Web Title : marathi news narendra modi keral tour and his dress 


संबंधित बातम्या

Saam TV Live