शिर्डीतल्या आजच्या भाषणातून मोदी वाजवणार २०१९ लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराचं बिगुल ?

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 19 ऑक्टोबर 2018

साईबाबांच्या शंभराव्या समाधी मोहोत्सावाचं औचित्य साधत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शिर्डी दौर्यावर आहेत. मोदी साई बाबांचं दर्शन घेऊन त्यानंतर जनतेला संबोधित करणार आहेत. साधारण साडे अकराच्या सुमारास मोदी शिर्तीतून जनतेला संबोधित करणार असल्याचं समजतंय. नरेंद्र मोदींच्या दौर्यादरम्यान संपूर्ण शिर्डीत चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आलाय.    

साईबाबांचा १०० वा पुण्यतिथी उत्सव सुरू आहे. तीन दिवस चालणाऱ्या या सोहळ्याचा समारोप आज होणार आहे. याठिकाणी शिर्डी संस्थान उभारत असलेल्या दर्शनबारी, शैक्षणिक संकुल, साई गार्डन, नॉलेज पार्क आणि सोलार प्रोजेक्टचं भूमिपूजनही पंतप्रधान नरेंद्र मोंदींच्या हस्ते होणार आहे. 

पंतप्रधान समाधी मंदिरात दर्शनासाठी उपस्थित असताना सर्वसामान्य साई भक्तांना साई बाबांचं दर्शन घेता येणार आहे. दरम्यान, नरेंद्र मोदी आजच्या त्यांच्या भाषणात काय बोलणार, २०१९ मध्ये येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराचं बिगुल वाजवणार का हे पाहणं महत्त्वाचंय. 

WebTitle :  narendra modi shirdi samadhi mohotsav loksabha election political speech 

संबंधित बातम्या

Saam TV Live