2022 पर्यंत देशातील शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचा सरकारचा प्रयत्न - नरेंद्र मोदी

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 20 जून 2018

केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांतील लाभार्थींशी थेट संवाद साधण्याच्या मालिकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शेतकऱ्यांशी संवाद साधलाय. 2022पर्यंत देशातील सर्व शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं मोदींनी यावेळी म्हंटलं.

शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमीत कमी कसा होईल आणि त्याचबरोबर शेतमालाची नासाडीही कमीत कमी कशी होईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही पंतप्रधान नरेंद मोदींनी म्हंटलंय.

गेल्या काही वर्षांमध्ये देशात शेतीबरोबरच दूधाचंही रेकॉर्ड ब्रेक उत्पादन झाल्याचंही मोदींनी अधोरेखित केलंय. देशभरात असलेल्या तीन लाख सेवा केंद्रचालक, शेतकऱ्यांसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सचं आयोजन करण्यात आलं होतं.

शेतीतील अत्याधुनिक सुविधा आणि विकासाच्या मुद्द्यावर पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.

संबंधित बातम्या

Saam TV Live