मोदींना चिठ्ठी आली आणि पंतप्रधानांनी भाषण आवरले 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 27 फेब्रुवारी 2019

नवी दिल्ली : पाकिस्तानने भारतीय हद्दीत घुसखोरी केल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चिठ्ठी देऊन कळविण्यात आली आणि मोदी भाषण अर्धवट सोडून कार्यक्रमातून निघून गेले.

नवी दिल्ली : पाकिस्तानने भारतीय हद्दीत घुसखोरी केल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चिठ्ठी देऊन कळविण्यात आली आणि मोदी भाषण अर्धवट सोडून कार्यक्रमातून निघून गेले.

दिल्लीत आज (बुधवार) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थिती युवा संसद पुरस्कार सोहळा पार पडला. या कार्यक्रमात मोदी, मोदीच्या घोषणा देण्यात आल्या. तसेच भारत माता की जय, वंदे मातरम घोषणांनी विज्ञान भवन दणाणून गेले. भारताने पाकिस्तानमध्ये घुसून केलेल्या हल्ल्यानंतर मोदींनी देश सुरक्षित हातात असल्याचे म्हटले होते. मोदी भाषण करत असतानाच त्यांना सुरक्षा रक्षकांकडून चिठ्ठी देत पाकिस्तानच्या घुसखोरीबाबतची माहिती देण्यात आली. त्यानंतर काही क्षणातच मोदींनी भाषण आवरते घेतले.

भारत आणि पाकिस्तानमध्ये संघर्ष वाढल्याच्या पार्श्वभूमीवर मोदींच्या निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीला तिन्ही दलाचे प्रमुख आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल उपस्थित आहेत. तसेच काही मंत्रीही या बैठकीला हजर होते.  आता भारत काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Web Title: marathi news narendra modi wind his speech at science centre after reading important message 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live