सूर्याच्या दिशेने झेपावले नासाचे 'पार्कर सोलर प्रोब' यान; मारुतीरायापेक्षा नासाचा मोठा पराक्रम

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 12 ऑगस्ट 2018

रामायणात मारुतीनं फळासारखे लालबुंद दिसणाऱ्या सूर्याला गिळण्यासाठी झेप घेतल्याचा उल्लेख  आहे. मात्र त्यानंतर कुणीही आग ओकणा-या सुर्याकडे पाहण्याचीही  हिम्मत केली नाही.
'नॅशनल अॅरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन'चे (नासा) 'पार्कर सोलर प्रोब' हे यान आज (रविवार) अंतराळात यशस्वीपणे झेपावले आहे. सूर्याच्या दिशेने झेपावून लाखो किलोमीटरचे अंतर पार करण्याची क्षमता या यानामध्ये आहे. तसेच हे यान पहिले मानवविरहित यान असल्याने याला मोठे महत्व असे प्राप्त झाले आहे.

'पार्कर सोलर प्रोब' या पहिल्या मानवविरहित यानाच्या प्रक्षेपणास तांत्रिक बिघाडाचे ग्रहण लागले होते. 'नासा'चे हे यान अवकाशात झेपावण्यासाठी अवघे 55 सेकंद शिल्लक राहिले असताना प्रक्षेपण नियंत्रकाच्या कक्षातून ''होल्ड, होल्ड, होल्ड' असा आवाज आला होता. त्यामुळे या यानाने प्रक्षेपण थांबवण्यात आले होते. या प्रक्षेपणादरम्यान 'हेलियम सिस्टीम'मधील बिघाड कारणीभूत ठरल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे काल (शनिवार) होणारे प्रक्षेपण आज घेण्यात आले. त्यानंतर आज या यानाचे प्रक्षेपण यशस्वीपणे घेण्यात आले. 

सोलर पार्क प्रोब हे यान एका कारच्या आकाराएवढे आहे. ते  सूर्याच्या पृष्ठभागापासून 40 लाख मैल दुरवरून त्याच्या कार्यकक्षेचा अभ्यास करणार आहे.  सूर्यामध्ये होणाऱ्या गुढ स्फोटांचा, त्याच्या कार्यप्रणालीचा अभ्यास करेल. विशेष म्हणजे हे यान आतापर्यंतच्या माननिर्मित कोणत्याही यंत्रांपेक्षा सर्वात जवळ जाऊन सुर्याचं निरीक्षण करणार आहे.

ही मोहिम यशस्वी झाल्यास नासाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तूरा खोवला जाणार हे नक्कीच.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live