उद्यापासून सर्व मंत्री दुष्काळी भागाचा दौरा करणार : गिरीश महाजन

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 1 मे 2019

नाशिक : मराठवाडा, नाशिकसह राज्यात तीव्र दुष्काळाची स्थिती आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी उद्या (ता.2) मुंबईत तातडीची बैठक बोलावली आहे. त्यात या विषयावर चर्चा होईल. उद्यापासून सर्व मंत्र्यांनी दुष्काळी भागाचा दौरा करावा अशा सुचना आल्या आहेत, अशी माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी येथे दिली. 

महाजन यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनानिमित्त शासकीय ध्वजवंदन झाले. यावेळी राष्ट्रपती पदक प्राप्त पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांना महाजन यांच्या हस्ते पदक वितरीत करण्यात आले. यावेळी ते म्हणाले, ''सध्या दुष्काळ तीव्र स्वरुपाचा आहे. नाशिक परिसरात अठ्ठावीस टक्के पाऊस कमी झाला आहे. पाण्याचे साठे मर्यादीत आहेत. येवला, नांदगाव, सिन्नर, मालेगाव आदी तालुक्‍यांत तीव्र टंचाई आहे. तेथे अडीचशे टॅंकर सुरु करण्यात आले आहेत. चारा छावण्यांची मागणी आली आहे. मराठवाड्यात यंदा तीव्र दुष्काळ आहे. तेथे पिण्याच्या पाण्यासाठी विशेष उपाययोजना केल्या जात आहेत.

''पिण्याच्या पाण्याचे टॅंकर, चारा छावण्या यांसह विविध उपाययोजना व साह्य केले जात आहे. त्यासाठी प्रशासनाला सुचना देण्यात आले आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी उदद्या (ता.2) मुंबईत बैठक बोलावली आहे. त्यात दुष्काळाचा आढावा घेऊन उपाययोजना निश्‍चित केल्या जातील. सर्व मंत्री उद्या (ता.2) पासून राज्यातील दुष्काळी भागाचा दौरा करतील. त्यासाठी वरिष्ठ स्तरावरुन सुचना आल्या आहेत.'' असेही महाजन म्हणाले. 

Web Title : All the ministers will visit the drought-like region tomorrow: Girish Mahajan

संबंधित बातम्या

Saam TV Live