नाशिक जिल्ह्यातील पाच बाजार समित्यांना बरखास्तीची नोटीस 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 28 एप्रिल 2018

नाशिक जिल्ह्यातील पाच बाजार समित्यांना बरखास्तीची नोटीस बजावण्यात आली आहे. शेतकऱ्यांना शेतमालाचा मोबदला देण्यास दिरंगाई करणाऱ्या पाच बाजार समित्यांना बरखास्तीची नोटीस देण्यात आली आहे. मनमाड, देवळा, उमराणे, येवला आणि मालेगाव बाजार समित्यांमधील व्यापाऱ्यांनी कांदा उत्पादकांची 5 कोटी रुपयांची थकबाकी न दिल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या पाचही बाजार समित्यांनी कर्त्यावत कसूर केल्याचं सांगत, जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे ह्यांनी ही कारवाई केली आहे.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live