नाशिक - भाजप आमदार अपूर्व हिरे यांच्या उपस्थितीत प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात अश्लील नृत्य..

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 27 जानेवारी 2018

भाजपचे स्थानिक आमदार अपूर्व हिरे यांच्या कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होत आणि अपूर्व हिरे हे याठिकाणी संपूर्ण कार्यक्रमादरम्यान उपस्थित होते

26 जानेवारी रोजी संपूर्ण देशात प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना नाशिक मध्ये मात्र धक्कादायक प्रकार समोर आला आहे.. 26 जानेवारी निमित्त नाशिकच्या कामाटवाडा परिसरात बी. एल. श्रीवास्तव यांच्या भोजपुरी मंडळाच्या वतीनं एका देशभक्तीपर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल्याचं सांगण्यात आलं होत. प्रत्यक्षात मात्र या कार्यक्रमात तरुणींचे अश्लील नृत्य आयोजित करण्यात आलं होतं. या मुलीनी अश्लील हावभाव करत आणि अंगविक्षेप करत उपस्थितांसमोर नाच केला. यावेळी काहीनी चक्क व्यासपीठावर जाऊन या तरुणींच्या अंगावर पैसे उधळले. सर्वात धक्कादायक प्रकार म्हणजे भाजपचे स्थानिक आमदार अपूर्व हिरे यांच्या कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होत आणि अपूर्व हिरे हे याठिकाणी संपूर्ण कार्यक्रमादरम्यान उपस्थित होते. अपूर्व हिरे भाजपचे विधान परिषदेचे आमदार असून त्यांच्या कार्यकर्त्यांनी नेमकी कोणती देशभक्ती दाखवली असा संतप्त सवाल उपस्थित झाला आहे ..नैतिकतेच्या आणि देशभक्तीच्या गप्पा मारणाऱ्या भाजपच्या स्थानिक आमदाराचा हे वर्तन संतापजनक असल्याचं बोललं जातंय. 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live