नाशकात पैशांचा पाऊस..

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 19 जून 2018

नाशिक: नाशिकच्या लेखानगर भागात एटीएममधून चक्क पैशांचा पाऊस पडलाय. नाशिकमधील ऍक्सिस बँकेच्या एटीएमधील एक अजब प्रकार समोर आलाय. एटीएममधून चक्क पाचपट पैसे निघाल्यानं अनेकांनी या एटीएममधून पैसे काढण्यासाठी गर्दी केली. अखेर ही बाब पोलिसांच्या लक्षात आली आणि त्यांनी हे एटीएम बंद केलं.

तांत्रिक बिघाडामुळे एटीएममधून पाचपट पैसे निघत होते. ऍक्सिस बँकेचं हे एटीएम असून याप्रकरणी नाशिकच्या अंबड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल कऱण्यात आली आहे. दरम्यान पैसे काढणाऱ्या ग्राहकांकडूनच पैसे वसूल केले जाणार असल्याचं बँक प्रशासनाकडून सांगण्यात आलीये.

संबंधित बातम्या

Saam TV Live