लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीच्या हातात पोलिसांची बेडी

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 3 जुलै 2018

नाशिक जिल्ह्यातल्या पांगरी गावातील किशोर पगारेच्या लग्नातील फोटोत तो फार आनंदी दिसतोय.  किशोरच्या लग्नाची हौस-मौज अवघे काही तासच टिकली.

कारण लग्नाच्या दुसऱ्या दिवशी नवरी किशोरला लुटून पळाली. नवरी मुलगी अनाथ असल्याचं सांगून मध्यस्थानं किशोरकडून पन्नास हजार रुपये घेतले होते. शिवाय नवरीच्या गळ्यात काही दागिनेही घातले होते. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी आजीला भेटायला जातो असं सांगून मुलगी नगरच्या श्रीरामपूरमध्ये आली आणि तिथून गायब झाली.

गेल्या काही वर्षांपासून मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात नवरदेवांना शेंडी लावणाऱ्या टोळ्यांचा सुळसुळाट झालाय. त्यामुळं शुभमंगल करण्याआधी नवरदेवांनो सावधान
 
संबंधित बातम्या

Saam TV Live