'युतीमुळे Congress-NCP च्या पायाखालची वाळू सरकली'- Girish Mahajan

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019

नाशिक - हिंदुत्वाच्या मुद्यावर गेल्या तीस वर्षांपासून असलेली युती अबाधित राहिली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत कोणत्या पक्षाला कोणती जागा द्यायची, याचे वाटप निश्‍चित झाल्याने काही जागांबाबत कार्यकर्त्यांची मागणी असली, तरी कोणताही बदल होणार नाही, अशी माहिती जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी येथे काल दिली.

नाशिक - हिंदुत्वाच्या मुद्यावर गेल्या तीस वर्षांपासून असलेली युती अबाधित राहिली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत कोणत्या पक्षाला कोणती जागा द्यायची, याचे वाटप निश्‍चित झाल्याने काही जागांबाबत कार्यकर्त्यांची मागणी असली, तरी कोणताही बदल होणार नाही, अशी माहिती जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी येथे काल दिली. युतीमुळे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पायाखालची वाळू सरकल्याने काँग्रेसकडून खोडसाळपणाचे आरोप होत असल्याची टीका त्यांनी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वक्तव्यावर केली.

नाशिक दौऱ्यावर आलेले जलसंपदामंत्री महाजन यांनी मंगळवारी पत्रकारांशी संवाद साधला. युती व्हावी अशी कार्यकर्त्यांची मनापासून इच्छा असल्याने युती कायम राहिली. लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपांचा निर्णय घेतला जाणार आहे. खासदार नारायण राणे यांनी युतीवर टीका केली असली, तरी त्यांचा राग शिवसेना व उद्धव ठाकरेंवर असून, भाजपवर नाही. सध्याच्या दहशतवादी हल्ल्याचा विचार करता देशाला मजबूत सरकारची गरज असल्यानेच भाजप-शिवसेनेची युती होणे काळाची गरज होती. ही बाब राणे यांनी समजून घ्यायला हवी, याकडे त्यांनी लक्ष वेधले. 

खडसेंच्या वक्तव्याला पाठिंबा
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री युतीचाच होईल, असे वक्तव्य केले. त्याचे समर्थन श्री. महाजन यांनी केले. किसान सभेच्या मागण्यांची राज्य सरकारने दखल घेत अंमलबजावणी सुरू केली. त्यामुळे किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी मुंबईत मोर्चा न आणण्याचे आवाहन त्यांनी केले.

आरोप खोडसाळपणाचे
‘ईडी’ची भीती दाखवून भाजपने शिवसेनेला युती करण्यासाठी भाग पाडले, असा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. त्यावर बोलताना युती होऊ नये म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी देव पाण्यात ठेवले होते; परंतु युती झाल्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. पुन्हा विरोधी बाकावर बसावे लागणार असल्याची भीती निर्माण झाल्याने खोडसाळपणाचे आरोप होत आहेत. भाजपला सूडबुद्धीचे राजकारण करायचे असते, तर काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांची चौकशी लावता आली असती. पण सूडबुद्धीचा भाजपचा स्वभाव नसल्याचे श्री. महाजन यांनी सांगितले.

Web Title: Congress and NCP dares to Shivsena BJP alliance says Girish Mahajan


संबंधित बातम्या

Saam TV Live