नाशिकच्या धरण परिसरात पर्यटकांचा जीवघेणा खेळ

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 29 जुलै 2019

नाशिकच्या धरण परिसरात पर्यटकांचा जीवघेणा खेळ सुरू आहे. नांदूरमध्यमेश्वर धरणातून 24 हजार क्यूसेक पाणी सोडलं जात असतांनाही जीव धोक्यात घालून पर्यटक धरणावरील फरशी पुलावर मौजमजा करतायेत. वैतरणा धरणासह अनेक पर्यटन स्थळांवर दारूच्या बाटल्यांचा खचही पहायला मिळतोय. 

धरणावर सेल्फी आणि फोटो काढण्यासाठी मनाई करण्यात आली तरी पर्यटक हा जीवघेणा अट्टाहास करतांना दिसतायेत. भावली, वैतरणासह इतर धरण परिसरातही धोकादायक पद्धतीने पाण्यात उतरून पर्यटक जीव धोक्यात घालतायेत. तर इकडे पोलिस आणि जलसंपदा विभागानं अक्षम्य दुर्लक्ष केल्याचं उघड होतंय. 

WebTitle : marathi news nashik deadly acts of tourists in Nashik dam area

संबंधित बातम्या

Saam TV Live