तलवारी, चोपर, सळ्या आणि दंडुक्यांनी हल्ला; नाशिकमध्ये फिल्मी स्टाईल गँगवर  

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 27 सप्टेंबर 2018

पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या विकण्यासाठी गॅंगवॉर झाल्याचं नाशिक जिल्ह्यातील मनमाड शहरामध्ये घडलंय.. या गॅंगवॉरमध्ये एका टोळीच्या म्होरक्याचा खून झालाय तर अनेक गाड्या फोडण्यात आल्यात. मनमाड स्टेशनवर अनेक अनधिकृत खाद्यपदार्थ, पेयजल, आणि किरकोळ विक्रेते आहेत. या व्यवसायामध्ये मनमाड मधील अनेक टोळ्या सक्रिय आहेत.

याच टोळ्यांमध्ये वर्चस्ववादामुळे अनेक वेळा कुरबुरी आणि हाणामाऱ्या व्हायच्या मात्र मंगळवारी चक्क फिल्मी स्टाईल गँगवर झाला. जमदाढे वस्ती मध्ये 20 ते 25 गुंडांनी तलवारी, चोपर, सळ्या आणि दंडुक्यांनी हल्ला चढवला. यात  वस्तीतील घरासमोर उभ्या असलेल्या गाडयांबरोबर, नागरिकांवर हल्ला केला. त्याला प्रतिउत्तर म्हणून तिथे राहणाऱ्या पापा शेख आणि त्याच्या टोळीनेही त्यांच्यावर प्रतिहल्ला चढवला.

समीर उर्फ पापा शेख याचा चॉपरनं वार करून खून करण्यात आला.  त्यामुळे गेले 2 दिवस संपूर्ण मनमाड शहरात तणावाचे वातावरण निर्माण झालंय. पोलिसांनी तातडीने हल्लेखोरांना चांदवड इथून अटक केलीय.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live