तुम्ही दूध पिताय की प्लास्टिक खाताय ?

तुम्ही दूध पिताय की प्लास्टिक खाताय ?

भेसळखोरांची कमी नाहीये. प्लास्टिकची अंडी आढळून आल्याच्या घटना समोर आल्या असतानाच आता दुधात प्लास्टिक आढळल्याची घटना समोर आलीय. दुधात चक्क रबरासारखा पदार्थ आधालालाय. हे दूध पाहून पुन्हा दूध पिण्याचंही धाडस होणार नाही.  पण, दुधात आहे तरी काय ? दुधात प्लास्टिकसदृश्य पदार्थ दिसून येतोय. हा धक्कादायक प्रकार नाशिकच्या सिडको भागात समोर आलाय.

पाथर्डी फाटा परिसरातील आनंदनगरच्या द्वारकेश सोसायटीत राहणाऱ्या रामाआधार सिंग यांनी रविवारी दूध आणलं. सोमवारी सकाळी दूध गॅसवर गरम करायला ठेवलं असता, त्यातून वेगळाच वास येऊ लागला. काहीवेळानंतर दुधामध्ये गाठी तयार होऊ लागल्या. दुधाच्यागाठी प्लास्टिकसदृश्य दिसत असल्यानं त्या ताणून पाहिल्या तर रबरासारख्या तानल्या जाऊ लागल्या. त्यामुळं हा दूध भेसळीचा प्रकार असल्याचा दावा केला जातोय.

दुधात प्लास्टिक आढळल्यानं याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला देण्यात आली. अधिकाऱ्यांनी दूध पाहिलं असता, दुधात प्लास्टिक नसून, दुध खराब झाल्यामुळं असं झालं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलंय.

आता दुधातही प्लास्टिक भेसळ होऊ लागलं तर प्यायचं तरी काय? दुधात खरंच प्लास्टिक भेसळ केलंय की हा काही वेगळा प्रकार आहे. रबरासारखा ताणणारा पदार्थ नक्की आहे तरी काय याची तपासणी करण्यासाठी दूध लॅबमध्ये नेण्यात येईल. त्यानंतरच खरं काय आणि खोटं काय ते समोर येईल. त्यामुळं तुम्ही सध्या तरी दूध पिताना काळजी घ्या. 

WebTitle : marathi news nashik health plastic found in milk  

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com