नाशिकमध्येही रुग्णालयात जादूटोण्याचा धक्कादायक प्रकार 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 24 एप्रिल 2018

पुणे रुग्णालयातील जादूटोण्याची घटना ताजी असतानाच नाशिकमध्येही जादूटोण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या जादूटोण्याची एक्स्क्लुझिव्ह दृश्यं साम टीव्हीच्या हाती लागलीयेत. रुग्णांसाठी देवदूतच असलेल्या डॉक्टरांच्या उपस्थितीमध्ये राशींच्या खड्यांचा बाजार भरल्याचा धक्कादायक प्रकार जिल्हा रुग्णालयात सोमवारी संध्याकाळी घडला. धक्कादायक बाब म्हणजे डॉक्टरांच्या परवानगीनंच मांत्रिकानं तंत्रमंत्र केल्याचं समजतंय. हा सगळा प्रकार नाशिकच्या सिव्हिल रुग्णालयात घडलाय.

पुणे रुग्णालयातील जादूटोण्याची घटना ताजी असतानाच नाशिकमध्येही जादूटोण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या जादूटोण्याची एक्स्क्लुझिव्ह दृश्यं साम टीव्हीच्या हाती लागलीयेत. रुग्णांसाठी देवदूतच असलेल्या डॉक्टरांच्या उपस्थितीमध्ये राशींच्या खड्यांचा बाजार भरल्याचा धक्कादायक प्रकार जिल्हा रुग्णालयात सोमवारी संध्याकाळी घडला. धक्कादायक बाब म्हणजे डॉक्टरांच्या परवानगीनंच मांत्रिकानं तंत्रमंत्र केल्याचं समजतंय. हा सगळा प्रकार नाशिकच्या सिव्हिल रुग्णालयात घडलाय. या घटनेमुळे ज्या बोटांनी डॉक्टर रुग्णांची नाडी आणि हृदयाचे ठोके मोजतात, त्याच डॉक्‍टरांची बोटे रस्त्यावर खडे विकणाऱ्याच्या हातात पाहून आजही समाजात अंधश्रद्धा टिकून असल्याचं जळजळीत वास्तव समोर आलं आहे. 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live