नाशिकमध्ये लेडी लखोबा लोखंडेचा धुमाकूळ; दहा जणांशी लग्न करुन घातला गंडा

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 24 सप्टेंबर 2018

अनेक महिलांशी लग्न करुन त्यांची फसवणूक करणाऱ्या लखोबा लोखंडेंची अनेक प्रकरणं यापूर्वी तुम्ही ऐकली असतील. पण नाशकात एका महिलेनं वेगवेगळ्या ठिकाणी तब्बल 10 लग्न करून पुरुषांची फसवणूक केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे.

मॅरेज ब्युरोच्या नावाखाली हा गोरख धंदा सुरू होता.
एकाशी लग्न केल्यानंतर वारंवार काहीतरी कारणं सांगून ही महिला तिच्या माहेरी जायची आणि आपला फोन बंद ठेवायची. काहीच एका नव्या पुरुषाशी ती विवाह करायची. तिथेही एक वेगळं कारण देत ही लेडी लखोबा लोखंडे तिच्या आधीच्या नवऱ्याच्या घरी जायची. वेगवेगळ्या नावानं आणि ओळखीनं या महिलेनं चक्क 10 लग्न केली.  राजेंद्र चव्हाण या तिच्या शेवटच्या नवऱ्यानं या महिलेचा भांडाफोड केलाय.

पोलिसांनी या प्रकरणी मुख्य आरोपीसह फसवणूक करणाऱ्या 3 महिलांना अटक करून त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. लग्नाच्या नावाखाली फसवणूक करणारं हे मोठं रॅकेट असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात आलीय.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live