हुतात्मा निनाद मांडवगणे अनंतात विलीन 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 1 मार्च 2019

नाशिक - जम्मू-कश्मीरमधील बडगाममध्ये बुधवारी हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळले. त्यात हुतात्मा झालेले नाशिकचे स्क्वॉड्रन लीडर निनाद अनिल मांडवगणे (33) यांच्यावर आज नाशिक येथे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. लष्कराकडून त्यांना मानवंदनाही यावेळी देण्यात आली.

आज सकाळी त्यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यानंतर नाशिकमधील अमरधाम येथे लष्करी इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले..

श्रीनगर विमानतळावरून बुधवारी सकाळी दहा वाजता उड्डाण घेतलेले एमआय-17 व्ही 5 बनावटीचे हवाई दलाचे हेलिकॉप्टर दहा मिनिटांतच कोसळले. या अपघातात पायलटसह सहाजण हुतात्मा झाले. त्यात नाशिकच्या उपनगरजवळील डीजीपीनगर येथील श्री साईस्वप्न को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीमधील बँक ऑफ इंडिया कॉलनीत राहणारे स्क्वॉड्रन लीडर निनाद अनिल मांडवगणे (33) हे हुतात्मा झाले. 

त्यांच्या पश्चात वडील अनिल, आई सुषमा, पत्नी विजेता, दोन वर्षांची मुलगी असा परिवार आहे. जर्मनीतील त्यांचा धाकटा भाऊ आज नाशिकमध्ये येण्याची शक्यता आहे.
 
WebTitle : marathi news nashik martyr ninad mandavgane amar rahe 

संबंधित बातम्या

Saam TV Live