रिक्षावाल्याकडून तरुणीची छेडछाड; चालत्या रिक्षेतून तरुणीची उडी

अभिजीत सोनावणे, साम टीव्ही, नाशिक
गुरुवार, 20 जून 2019

तू मुझे अच्छी लगती है असं म्हणत रिक्षावाल्याची मजनूगिरी उफाळून आली आणि त्यानं चालत्या रिक्षेत तरुणीचा हात पकडला. नाशिकमधल्या या घटनेनं खळबळ माजलीय.

घाबरलेल्या मुलीनं आपला हात सोडवण्याचा प्रयत्न केला, आराडाओरडा केला पण त्यानं रिक्षा थांबवली नाही. त्यामुळं या मुलीनं घाबरुन धावत्या रिक्षेतून उडी घेतली. यात तरुणीच्या चेहरा आणि उजव्या हाताला जखम झालीय.

यानंतर तरुणीनं आईसह पोलिस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी अंबड गावात राहणाऱ्या रवी गोफणे या रिक्षाचालकाला रात्री अटक केली.

खरंतर रिक्षाचालकांकडून होणाऱ्या मारहाण, लुटमार यांसारख्या घटनांमुळे नाशिककर आधीच त्रस्त आहेत. त्यातच आता विनयभंगासारखे प्रकारही होऊ लागल्यानं त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी होतेय. 

WebTitle : marathi news nashik molestation in auto by auto driver crime maharashtra 

संबंधित बातम्या

Saam TV Live