माता न तू वैरिणी; आईनेच केला मुलीचा ब्लेडने वार करून खून

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 18 जुलै 2019

नाशिक/म्हसरूळ - आडगाव शिवारात मंगळवारी (ता.16) दुपारी अवघ्या 14 महिन्यांच्या चिमुकलीचा ब्लेडने वार करून निर्घृण खून केल्याप्रकरणी बुधवारी जन्मदात्री योगिता मुकेश पवार हिला आडगाव पोलिसांनी अटक केली.

घरात शिरलेल्या चोरांनी चिमुकली स्वराचा खून केल्याचा आणि स्वत:वरही ब्लेडने वार करून जखमी केल्याचा बनाव संशयित योगिताने केला होता.

त्यामुळे तिच्यावर जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचार सुरू असताना, आज सायंकाळी तिला पोलिसांनी अटक केली. साई पॅराडाईज अपार्टमेंटमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंता मुकेश पवार हे पत्नी योगिता, मुलगा व मुलीसह राहतात. त्यांच्या 14 महिन्यांच्या स्वरा या मुलीवर गळ्यावर ब्लेडने वार करून निर्घृणपणे खून करण्यात आल्याची घटना घडली होती.

Web Title: Mother Arrested by Child Murder Case Crime

संबंधित बातम्या

Saam TV Live