नाशिकमधील मेडीकल कॉलेजमध्ये चक्क व्हेंटिलेटरमध्ये सापडलं झुरळ 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 24 एप्रिल 2018

नाशिकमध्ये आरोग्य सेवेचा बोजवारा वाजलेला सातत्याने पाहायला मिळतोय. नाशिकमधील मेडीकल कॉलेजमध्ये चक्क व्हेंटिलेटरमध्ये झुरळ सापडलं. नाशिकच्या आडगाव मेडिकल कॉलेजमध्ये ही धक्कादायक घटना घडलीये. रुग्णाच्या नातेवाईकांकडून याच संदर्भातली तक्रार  केल्यानंतर तब्बल तीन तासांनी हॉस्पिटल प्रशासनाने याची दखल घेतली. दरम्यान, उपचारादरम्यान एका 45 वर्षीय महिलेचा मृत्यू झालाय, पण हा मृत्यू व्हेंटिलेटरमुळे झालाय का नाही हे पाहणं महत्त्वाचं आहे. आता आडगाव मेडिकल कॉलेविरुद्ध कारवाई करण्याची मृतकाच्या नातेवाईकांकडून मागणी केली जातेय.

नाशिकमध्ये आरोग्य सेवेचा बोजवारा वाजलेला सातत्याने पाहायला मिळतोय. नाशिकमधील मेडीकल कॉलेजमध्ये चक्क व्हेंटिलेटरमध्ये झुरळ सापडलं. नाशिकच्या आडगाव मेडिकल कॉलेजमध्ये ही धक्कादायक घटना घडलीये. रुग्णाच्या नातेवाईकांकडून याच संदर्भातली तक्रार  केल्यानंतर तब्बल तीन तासांनी हॉस्पिटल प्रशासनाने याची दखल घेतली. दरम्यान, उपचारादरम्यान एका 45 वर्षीय महिलेचा मृत्यू झालाय, पण हा मृत्यू व्हेंटिलेटरमुळे झालाय का नाही हे पाहणं महत्त्वाचं आहे. आता आडगाव मेडिकल कॉलेविरुद्ध कारवाई करण्याची मृतकाच्या नातेवाईकांकडून मागणी केली जातेय. नाशिकमध्ये सातत्याने आरोग्य सेवेचा बोजवारा वाजलेला पाहायला मिळालाय.  त्यामुळे आता तरी नाशिकमधल्या आरोग्य सेवा सुधारणार का हा प्रश्न सामान्य नाशिककर विचारतायत.

 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live