वडिलांच्या छंदामुळे मिळाला भारतातील पहिली ग्लायडरचालक बनण्याचा मान

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 25 फेब्रुवारी 2019

नाशिक - वडिलांना ग्लायडिंगची आवड... मात्र नोकरीमुळे त्यांना आवड जोपासता येत नव्हती. वडिलांसमवेत पुण्यात पॅसेंजर सिटीवर बसून गगनभरारीचा आनंद घेतला. मात्र, या भरारीत प्रश्‍न पडला वडिलांच्या सीटवर बसून स्वत: भरारी घेण्याचा... यासाठी कमी पडत होते ते वय... अन्‌ देशाची नियमावली... यासाठी थांबावे लागणारे होते एक वर्ष... एक वर्षाच्या काळात उडण्याचे ध्येय बाळगत कन्येने घेतले प्रशिक्षण अन्‌ सर्वांत कमी वयात अर्थात, अवघ्या चौदाव्या वर्षी इंग्लंडमध्ये जात भारतीय ग्लायडरचालक बनण्याचा मान पटकविला आहे.

नाशिक - वडिलांना ग्लायडिंगची आवड... मात्र नोकरीमुळे त्यांना आवड जोपासता येत नव्हती. वडिलांसमवेत पुण्यात पॅसेंजर सिटीवर बसून गगनभरारीचा आनंद घेतला. मात्र, या भरारीत प्रश्‍न पडला वडिलांच्या सीटवर बसून स्वत: भरारी घेण्याचा... यासाठी कमी पडत होते ते वय... अन्‌ देशाची नियमावली... यासाठी थांबावे लागणारे होते एक वर्ष... एक वर्षाच्या काळात उडण्याचे ध्येय बाळगत कन्येने घेतले प्रशिक्षण अन्‌ सर्वांत कमी वयात अर्थात, अवघ्या चौदाव्या वर्षी इंग्लंडमध्ये जात भारतीय ग्लायडरचालक बनण्याचा मान पटकविला आहे. या कन्येचे नाव आहे, ऋचा रवींद्र वायकर.  

 

रवींद्र वायकर यांना ग्लायडिंगची आवड. मात्र, नोकरीच्या निमित्ताने त्यांना छंद जोपासता आला नाही. ऋचा १३ वर्षांची असताना पुणे ग्लायडर क्‍लबमध्ये वडिलांसोबत गेली. कॅप्टन केव्हिन यांच्यासोबत ३० मिनिटे ती ग्लायडरमध्ये होती. त्या विमानात पॅसेंजर सीटवर काही मिनिटांचा प्रवास केल्यानंतर तिने वडिलांना प्रश्‍न केला, की पप्पा मला आपल्या सीटवर बसून उड्डान करायचे आहे. श्री. वायकर यांनी आता तू बसू शकत नाही, त्यासाठी तुला प्रशिक्षण घ्यावे लागेल. यासाठी आता तुझ्याकडे एक वर्ष अवधी असल्याचे सांगितले. त्या वेळी ऋचाचे वय होते १३ वर्षे. तिची आवड लक्षात घेऊन हडपसर ग्लाइडिंग सेंटरचे मुख्य फ्लाइट प्रशिक्षक कॅप्टन शैलेश चरबे यांच्याशी श्री. रायकर यांनी चर्चा केली. त्यांनी क्‍लबच्या प्रशिक्षण रजिस्टरमध्ये ऋचाचे नावही नोंदवून घेतले. मात्र जेव्हा ती १६ वर्षांची असेल तेव्हा तिच्या फ्लाइंग ट्रेनिंगची सुरवात होईल, असे त्यांनी सांगितले. कारण भारतात यासाठीची वयोमर्यादा १६, तर इंग्लडमध्ये १४ वर्षे आहे. श्री. वायकर ३१ वर्षांपासून कार्यरत असलेल्या मुंबईतील स्कायलाइन एविएशन ॲकॅडमीचे मुख्य प्रशिक्षक कॅप्टन ए. डी. माणेक यांच्याशी संपर्क साधला.

कॅप्टन माणेक यांनी ग्लायडिंग सेंटर, हडपसर (पुणे) चे माजी प्रमुख कॅप्टन सुशील वाजपेयी यांना हा विषय सांगितला. त्यांनी ऋचाच्या पालकांना लष्म या इंग्लंडमधील ॲकॅडमीचा पर्याय सांगितला. एप्रिल २०१८ मध्ये दोन आठवड्यांसाठी तिने ‘लष्म’मध्ये प्रशिक्षणासाठी नावनोंदणी केली. तेथे मार्टिन कॉन्बॉय, माइक बर्चशी, जॉर्डन िब्रज तिचे प्रशिक्षक होते. १३ एप्रिल २०१८ ला वयाच्या १४ व्या वर्षी दुपारी तीनला तिने प्रशिक्षकांसह आपल्या जीवनातील पहिले उड्डाण केले. सप्टेंबरमध्ये ती पुन्हा दोन आठवड्यांच्या प्रशिक्षणासाठी गेली. २६ सप्टेंबर २०१८ ला तिने आकाशभरारी घेतली. तिची दहावीची परीक्षा असल्याने एप्रिल २०१९ मध्ये ती पुढील प्रशिक्षण घेणार असून, २०२१ मध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय ग्लायडिंग चॅंपियनशीपमध्ये ती भारताचे प्रतिनिधित्वही करणार आहे.

आर्थिक परिस्थितीमुळे मला ग्लायडिंगचा छंद जोपासता आला नाही. मात्र ऋचाने माझे स्वप्न पूर्ण केले. तिच्यामुळे इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल.
- रवींद्र वायकर, मुंबई

Web Title: gliding rucha waikar success motivation


संबंधित बातम्या

Saam TV Live