राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार - 'कच्चा लिंबू' सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

नवी दिल्ली : आज (ता. 13) 65व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली. या पुरस्कारांमध्ये मराठीनेही बाजी मारली. प्रसाद ओक दिग्दर्शित 'कच्चा लिंबू' या चित्रपटाला मराठी सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार मिळाला, तर सर्वोत्कृष्ट शॉर्टफिल्म पुरस्कार मराठीच्या सुयश शिंदे दिग्दर्शित 'मयत'ला मिळाला. 'म्होरक्या' या चित्रपटाला स्पेशल मेन्शन अॅवॉर्ड व सर्वोत्कृष्ट बालचित्रपट पुरस्कार मिळाला. 'मृत्यूभोग' या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट संपादनासाठी पुरस्कार मिळाला आहे. नागराज मंजुळेच्या 'पावसाचा निबंध'ला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून गौरविण्यात आले आहे.

नवी दिल्ली : आज (ता. 13) 65व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली. या पुरस्कारांमध्ये मराठीनेही बाजी मारली. प्रसाद ओक दिग्दर्शित 'कच्चा लिंबू' या चित्रपटाला मराठी सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार मिळाला, तर सर्वोत्कृष्ट शॉर्टफिल्म पुरस्कार मराठीच्या सुयश शिंदे दिग्दर्शित 'मयत'ला मिळाला. 'म्होरक्या' या चित्रपटाला स्पेशल मेन्शन अॅवॉर्ड व सर्वोत्कृष्ट बालचित्रपट पुरस्कार मिळाला. 'मृत्यूभोग' या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट संपादनासाठी पुरस्कार मिळाला आहे. नागराज मंजुळेच्या 'पावसाचा निबंध'ला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून गौरविण्यात आले आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांना जाहिर झाला. 

65व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारातील काही महत्त्वाचे पुरस्कार - 

 • सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट - 'कच्चा लिंबू'
 • सर्वोत्कृष्ट शॉर्टफिल्म -  'मयत'
 • स्पेशल मेन्शन पुरस्कार -  'म्होरक्या'
 • सर्वोत्कृष्ट बालचित्रपट पुरस्कार - 'म्होरक्या'
 • सर्वोत्कृष्ट संपादन - 'मृत्यूभोग'
 • विशेष गौरव - 'पावसाचा निबंध'
 • सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट - 'न्यूटन'
 • सर्वोत्कृष्ट भूमिका - पंकज त्रिपाठी (न्यूटन)
 • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - श्रीदेवी (मॉम)
 • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - दिव्या दत्ता
 • बेस्ट अॅक्शन डिरेक्शन अॅवॉर्ड - बाहुबली 
 • बेस्ट कोरिओग्राफी अॅवॉर्ड - 'गोरी तू लथ मार' (टॉयलेट- एक प्रेमकथा)
 • बेस्ट स्पेशल इफेक्टस् अॅवॉर्ड- 'बाहुबली' 
 • सर्वोत्कृष्ट संगीतकार - ए. आर. रहमान (तमिळ चित्रपट - 'मॉम')
 • स्पेशल ज्युरी अॅवॉर्ड - 'नगर किर्तन'

संबंधित बातम्या

Saam TV Live